
मा. पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यक्षेत्रातील वाहतूक शाखेचे विभागामध्ये दर महिन्याचे पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी एकदिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो या उपक्रमांतर्गत वाहतूक शाखेच्या एकूण 15 टीमच्या माध्यमातून शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघात विषयी माहिती व्यसनाधीनते पासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा वापर, महिलांचा सन्मान करणे इत्यादी मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात येते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व चांगला माणूस बनावे या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधन पर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स हे 10,000 पुस्तके व युवराज मलिक लिखित माय डे इन पुणे बुक फेस्टिवल 7000 पुस्तकाचे सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.