
एमआयडीसी तील कारखाने टिकविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी एमआयडीसी भयमुक्त करण्यास प्राधान्य आहे. स्थानिक गुंड कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास देत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल कंपनी व्यवस्थापन उद्योजकांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी केले एमआयडीसी तील सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी स्वतंत्र महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यान्वित केले आहे तसेच डायल ११२ क्रमांकावरुन पोलीस मदत उपलब्ध होते औद्योगिक तक्रारींच्या निवारणासाठी पोलीसांच्या खंडणीविरोधी पथकामध्ये औद्योगिक तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.