
पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्येष्ठानुबंध या अॅपमध्ये जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी कुशल व प्रशिक्षित अमंलदार यांचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आलेला असुन सदरचे अॅप हे 24 तास सुरु राहणार आहे. सदर अॅपमध्ये आतापर्यंत पिंपरी चिंचवड शरिातील 20 हजार जेष्ठ नागरिकांनी नोंदणी केलेली आहे. हे केवळ अॅप नसुन तर ज्येष्ठ नागरिकांशी जोडलेले ऋणानुबंध आहेत. तसेच ज्येष्ठांना इतर कोणतीही मदत लागल्यास (उदा. एकाकी जेष्ठांना औषधे, जवळील हॉस्पिटलची नावे, अॅम्ब्युलन्स सेवा, तात्काळ संपर्क क्रमांकाची मदत तसेच इतर आवश्यक मदत लागल्यास सर्व माहिती इत्यादी) पोलीसांच्या मार्फत तात्काळ मदत उपलब्ध करुन दिली जाईल. या अॅपमध्ये आर्टीफिशियल इन्टिलिजन्सचा उपयोग करुन ज्येष्ठ नागरिकांना दिलेले सेवांचे विश्लेषण करुन सेवा अधिक गुणात्मक पध्दतीने देण्याचे काम याअॅप द्वारे देण्यात येईल. ज्येष्ठानुबंध हे एक अॅप नसून एका पिढीने दुसया पिढीला दिलेला आदराचे, प्रेमाचे आणि सुरक्षिततेचे वचन आहे. मुल्य जपणाया समाजाची आधुनिक ओळख म्हणजेच ज्येष्ठानुबंध अॅप आहे.