दिशा उपक्रम
दिनांक ०५.०१.२०२४ रोजी रेझिंग डे अनुषगाने दिश उपक्रमार्गत विशेष बाल पोलीस पथकामार्फत "विमल फांऊडेशन" या सामाजिक संस्थेच्या मदतीने पिंपरी पोलीस ठाणे, व निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील वस्ती / झोपडपट्टी भागामध्ये तसेच पोलीस स्टेशन स्तरावर १. व्यसनमुक्ति, २. बालकांची सुरक्षितता, ३. गुन्हेगारीला आळा ४. बालकांचे शिक्षण, ५. बालविवाह इ. विषयावर शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्या समवेत व्यासनमुक्ती रॅली काढून जनजागृती व मागदर्शन केले सदर वेळी विमल फाऊंडेशनचे अध्याक्ष विल्यम साळवी व त्याचे प्रतीनिधी उपस्थित होते दिनांक ०६.०१.२०२४ रोजी रेझिंग डे अनुषगाने दिश उपक्रमार्गत विशेष बाल पोलीस पथकामार्फत "होप फोर द चिल्ड्रन फाउंडेशन व मुस्कान फाउंडेशन " सामाजिक संस्थेच्या मदतीने पिंपरी पोलीस ठाणे, व निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील वस्ती / झोपडपट्टी भागामध्ये तसेच पोलीस स्टेशन स्तरावर १. बाल लैगिक अत्याचार २. व्यसनमुक्ति, ३. बालकांची सुरक्षितता, ४. गुन्हेगारीला आळा, ५. बालकांचे शिक्षण, ६. बालविवाह इ. विषयावर शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्या समवेत व्यासनमुक्ती रॅली काढून तसेच पथनाट्य सादर करून जनजागृती व मागदर्शन केले. दिशा उपक्रमांतर्गत दिनांक ३१.०८.२०२४ व दिनांक ०१.०९.२०२४ रोजी शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी येथे अंमित फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले होते. सदर अंमित फुटबॉल सामन्यांमध्ये ३० फुटबॉल टिम मध्ये ४५८ बालके सहभागी झाले होते.