
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणीविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे दिघी परिसरातून पाहिजे आरोपी राहुल रमेश चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ₹५३,००० किंमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तूल, २ मॅगझिन व २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपीविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.