"पिंपरी चिंचवड पोलीसांनी ज्येष्ठांचा साजरा केला वाढदिवस..."
२३ मार्च, २०२६
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांना पोलीस सेवा व इतर आवश्यक सेवा सहज उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी "ज्येष्ठानुबंध" हा ॲप विकसित करुन एक अभिनव उपक्रम सुरु केलेला आहे. या उपक्रमांतर्गत नमुद ॲपवरुन ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस खात्या सबंधी तसेच त्यांच्या वैयक्तीक इतर अडचणी मांडल्यावर त्यांना पोलीसांकडुन तात्काळ मदत पुरविली जात आहे. आजतागायत पिंपरी चिंचवड हद्दीतील एकुण २८,००० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी सदर ॲप डाऊनलोड करुन त्यांचा सहभाग नोंदविला आहे.
सदर उपक्रमांतर्गत अधिक एक पाऊल पुढे जावून श्री. विनय कुमार चौबे यांनी, ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन स्तरावर पोलीसांनी नियमित भेटी देवुन त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करणे बाबत एक आगळे वेगळे पाऊल टाकले आहे. त्याअनषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदार हे त्यांचे हद्दीतील ज्या ज्येष्ठ नागरिकाचा वाढदिवस आहे त्या ज्येष्ठ नागरिकाचे घरी किंवा वृध्दाश्रमात भेट देऊन त्यांच्या सोबत केक कापुन व पुष्प गुच्छ भेट देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करुन आनंद द्विगुणीत करतात. मागील दोन दिवसांत पोलीस आयुक्तालय हद्दीतील ज्येष्ठ नागरिक १) श्रीमती सुशीला कपालदास गुलाणी, वय ६१ वर्षे, रा. नवताजधाम वृध्दाश्रम, अंबी, ता. मावळ जि. पुणे २) श्रीमती पद्मा किशोर सरपोद्दार, ७७ वर्षे, रा. कुलदीप रेसीडन्सी, फ्लॅट नं.०१, सेक्टर नं.१, वैष्णोमाता मंदिराजवळ, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे ३) श्री. नयन रमाकांत पानसरे, वय ७४ वर्षे, रा. ब्ल्युरिज राजीव गाधी इन्फोटेक पार्क, फेज १, हिंजवडी, पुणे यांची समक्ष भेट घेवुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे वाढदिवस साजरे केले आहेत. या उपक्रमाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून सदर उपक्रम देनंदिन स्तरावर आयुक्तालयाच्या हद्दीत साजरा केला जाणार आहे.
"ज्येष्ठानुबंध" उपक्रमास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी ज्येष्ठानुबंध ॲप डाऊनलोड करुन त्यांचा सहभाग नोंदवावा, असे पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी आवाहन केले आहे.