
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या निदर्शनानुसार प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे "नॉर्थईस्ट कम्युनिटी कनेक्ट" हा उपक्रम राबविण्यात आला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे हाद्दीमध्ये व्यवसाय व शिक्षणाकरिता वास्तव्यास असलेल्या उत्तर पूर्व भारतातील नागरिकांना पोलीस आयुक्त कार्यालय व विविध पोलीस ठाणे येथे निमंत्रित करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील व पोलीस स्टेशनच्या ध्वजावंदन कार्यक्रमाकरिता उत्तर पूर्व भारतातील ७८ नागरिक हजर होते. एकूणच "नॉर्थईस्ट कम्युनिटी कनेक्ट" हा उपक्रम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे यशस्वीपणे राबविण्यात आला असून ईशान्य राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विश्वास, सुरक्षितता आणि समाजातील आपलेपणाची भावना दृढ करण्यास उपयुक्त ठरला आहे