
बावधन पोलिसांनी शेअर मार्केटमधील तोटा भरून काढण्यासाठी Honda Elevate कार चोरी करून ती राजस्थान येथे विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले. CCTV व गोपनीय माहितीच्या आधारे कारचा माग काढून आरोपीस सुमारे १२ तासांत ताब्यात घेण्यात आले. चोरीस गेलेली Honda Elevate कार, किंमत ₹१४ लाख, पोलिसांनी हस्तगत केली.