
बावधन पोलिसांनी मोटारसायकल चोरी करून त्यांचे स्पेअरपार्ट काढून भंगारात विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेत ५ मोटारसायकली व स्पेअरपार्ट असा एकूण ₹२.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली.