
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांच्याकडून नागरिकांना विविध पोलीस सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात व गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कायद्याविषयी जनजागृतीचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम सातत्याने आयोजित केले जातात माहे ऑक्टोबर २०२५ हा महिना मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सुरक्षा विषयक जनजागृतीचा महिना घोषित केला आहे त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 14/10/2025 रोजी सकाळी 11/00 ते 13/30 या कालावधीत पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांनी सायबर सुरक्षा विषयक विद्यार्थी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचे दृष्टीने X या माध्यमाचा प्रभावी उपयोग करून व्हर्च्युअल टाऊनहॉल या अभिनव संकल्पनेंद्वारे सर्व स्तरातील नागरिकांशी सुसंवाद साधला. सदर उपक्रमामध्ये पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ८१ ठिकाणावरील शाळा कॉलेज औद्योगिक समूह येथील १२ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी व नागरिकांना प्रत्यक्ष सहभाग घेतला व एकूण ३३,८४४ नागरिकांनी ऑनलाईन हजेरी लावली या प्रमाणे सुमारे ४५ हजार पेक्षा जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला मा. पोलीस आयुक्त यांनी नमूद ठिकाणी हजार असलेल्या विद्यार्थी नागरिकांना सायबर गुन्हे व सुरक्षा बाबत ऑनलाईन मार्गदर्शन करून जनजागृती केली.