
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बिनतारी संदेश दळणवळणाकरिता चतुर्श्रुंगी व चाकण येथे बिनतारी पुन:प्रक्षेपण केंद्र कार्यरत आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा विस्तार झाल्याने त्याचप्रमाणे देहू आळंदी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बंदोबस्ताकरिता बिनतारी दळणवळण क्षेत्र विस्तारणेच्या दृष्टीने नवीन पून:प्रक्षेपण केंद्राची आवश्यकता होती त्या दृष्टीने दुर्गा टेकडी येथे नवीन पुन:प्रक्षेपण केंद्र उभारण्यात आले आहे