
राज्यातील अत्याधुनिक पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय इमारतीच्या भूमिपूजन सोहळा आज महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री व गृह मंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे माननीय उपमुख्यमंत्री व पालकमंत्री श्री. अजित पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. नवीन आयुक्तालयामध्ये विशेष शाखा, गुन्हे शाखा, महिला सहाय्यता कक्ष, ज्येष्ठ नागरिक कक्ष, बिनतारी नियंत्रण कक्ष, वॉर रूम, सीसीटीव्ही कक्ष, सोशल मीडिया लॅब तसेच इतर महत्त्वपूर्ण प्रशासकीय व सहाय्यक विभाग कार्यरत असतील – जे आधुनिक आणि नागरिक-केंद्रित पोलिसिंगच्या दृष्टीकोनाचे प्रतीक आहे.