
"पोलीस आयुक्तांची भेट..." पिंपरी चिंचवड आयुक्तांच्या उपक्रमास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद ..." पिंपरी पिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांशी अधिक प्रभावी, पारदर्शक व सकारात्मक संवाद प्रस्थापित करण्यासाठी "पोलीस आयुक्तांची भेट" हा विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नागरिक व शहरातील अभ्यगतांना पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट भेट घेवुन आपल्या सुचना, तक्रारी व अपेक्षा मांडण्यास संधी उपलब्ध करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांना कोणत्याही प्रकारे पुर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नसुन नागरिक उपक्रमाच्या दिवशी विहीत वेळेत बिनदिक्कत पोलीस आयुक्तांना भेटु शकतील. दिनांक ०९/०३/२०२६ रोजी पोलीस आयुक्तांची भेट हा विशेष उपक्रम पोलीस आयुक्त, कार्यालय येथील शिवनेरी हॉल येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरीता ७६ नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. सदर कार्यक्रमाकरीता शिवनेरी हॉल येथे पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उप आयुक्त तसेच व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे सर्व सहा. पोलीस आयुक्त व सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे हजर होते. सदर कार्यक्रमात नागरिकांनी त्यांच्या समस्या तसेच वाहतुक विषयक समस्या व सुचना मांडल्या. सदर उपक्रमास दिघी पोलीस स्टेशन गु.र.नं ५१०/२०२५ या घरफोडीच्या गुन्हयातील फिर्यादी परमेश्वर गिराम हे हजर होते. त्यांनी त्यांच्या गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने १०० टक्के पोलीसांनी परत मिळवुन दिल्या बद्दल त्यांनी मा. पोलीस आयुक्त यांचा सत्कार केला व पोलीसांच्या चांगल्या कामगिरीबाबत कौतुक केले. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील ऑर्थोपेडिक डॉक्टर असोशिएशनचे पदाधिकारी हजर होते त्यांनी त्यांच्या समस्या सांगुन सुचना मांडल्या तसेच पोलीसांना मदत करण्याबाबत पुढाकार दर्शविला. "पोलीस आयुक्तांची भेट" हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. सदरचा उपक्रम हा दर सोमवारी असाच चालु राहणार असुन नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. सदर कार्यक्रमाकरीता पिंपरी चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिक, औद्योगिक प्रतिनिधी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच शहरातील अभ्यगतांनी या उपक्रमास हजर राहुन आपल्या तक्रारी व सुचना मांडाव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.