
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ९ गणेश मंडळांकडून उच्च क्षमतेचे डीजे/डॉल्बी साऊंड सिस्टीम वापरून ध्वनीप्रदूषण केल्याचे आढळून आले. संबंधित मंडळांकडून ०५ डीजे मिक्सर, ०३ डीजे कन्सोल, ०१ लाईट कंट्रोल मशीन, ०३ लॅपटॉप, ०१ स्पीकर व ०१ डीजे सेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मंडळांचे अध्यक्ष, डीजे मालक व चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.