
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये ऑक्टोबर महिना सायबर सुरक्षा जनजागृती महिना म्हणून साजरा करण्यात येत असून त्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांना सायबर सुरक्षा बाबत माहिती पोहोचविण्याकरिता विविध जनजागृती कार्यक्रम घेणे बाबत मा. पोलीस महासंचालक सो महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सूचना व आदेशित करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड हद्दीतील नागरिकांमध्ये जनजागृती करणे करिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर दि. 30/10/2025 रोजी सकाळी 07:00 वा. भक्ती शक्ती चौक निगडी येथे 5 किलोमीटर cyber safe PCPC Walkathon आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाला अभिनेता शिव ठाकरे यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेणेबाबत आवाहन करून सायबर हेल्पलाईन नंबर 1930 व cybercrime.gov.in या वेबसाईट बाबत माहिती दिली मा. पोलीस उपायुक्त श्री बापू बांगर यांनी नागरिकांना सायबर फसवणूक होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच सायबर पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत माहिती दिली. वॉकेथॉन मध्ये 600 ते 650 नागरिकांनी पाच किलोमीटर वॉकेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली.