
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांच्या उल्लेखनीय सेवेसाठी विविध राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक व विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले.