मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaPimpri Chinchwad Police Emblemपिंपरी चिंचवड पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा

कल्याणकारी उपक्रम

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याण योजनांवरील अद्यतने.

मधुमेह आणि आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन3 फोटो

मधुमेह आणि आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मार्गदर्शन

३ नोव्हें, २०२५

मा. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उत्तम आरोग्य व स्वास्थ्य मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 1/11/2025 रोजी सकाळी 11:30 ते 13:30 वा. पर्यंत श्री. बालाजी विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री.विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त यांनी उपस्थितांना आहार व स्वास्थ्य याबाबत मार्गदर्शन करून प्रस्तावित केले. तसेच मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ दीक्षित मधुमेह आहार तज्ञ यांचा सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात केली. सदर कार्यक्रम प्रभावी करण्याकरता पोलीस अधिकारी अंमलदार यांना त्यांचे आरोग्य व स्वास्थ्य अनुषंगाने मार्गदर्शन होणेसाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये डॉ. जगन्नाथ दीक्षित मधुमेह व आहार तज्ञ यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालातील अधिकारी अंमलदार यांना निरोगी राहण्यासाठी आहार सवयी व्यायाम इत्यादी बाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केले पोलीस आयुक्तालयातील 600 अधिकारी व अंमलदार हजर होते पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
तपशील पहा
पिंपरी चिंचवड पोलीस  आयुक्तालयामध्ये पोलीस  पाल्यांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन5 फोटो

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस पाल्यांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन

१० एप्रि, २०२५

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय श्री विनय कुमार चौबे यांचे संकल्पनेतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मा. मुख्यमंत्री सो यांचा १०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड आयुक्तलयामध्ये पोलीस पाल्यांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल रहाटणी पुणे येथे आज रोजी आयोजित करण्यात आला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत आजी-माजी अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी व आपले दैनंदिन कामकाज करीत असताना एक कुटुंब प्रमुख म्हणून पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी त्यांचे प्रति असलेली आपली बांधिलकी ही जोपासली. सदर कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे मा. श्री. वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. शिवाजी पवार पोलीस उपयुक्त परिमंडळ 3 श्री. विशाल गायकवाड पोलीस उपयुक्त परिमंडळ 2, श्री. सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, सदर रोजगार मेळाव्यास टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, हुंडाई, लुमॅक्स या नावाजलेल्या कंपन्यांसह ऐकून 37 विविध कंपन्यांचे प्रतिनिधी एच आर व 250 पोलीस पाल्ये उपस्थित होते उपस्थित उमेदवार पैकी पाल्यांची निवड करण्यात आली तसेच मुलाखतीच्या दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी उमेदवारांची निवड होऊ शकते श्री विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर श्री डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 यांनी आभार प्रदर्शन केले
तपशील पहा
पोलीस दवाखान्याचे उद्घाटन2 फोटो

पोलीस दवाखान्याचे उद्घाटन

२९ मार्च, २०२५

कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता पोलीस दल कायम तत्पर असते मात्र कामाचा ताण शारीरिक मानसिक थकवा यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाहीत अनेकदा पोलिस अधिकारी व अंमलदार यांना 24 तास ऑन ड्युटी राहावे लागते त्यामुळे पोलीसांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात तसेच विविध आजार उद्भवतात त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये वाकड येथील कावेरी नगर पोलीस वसाहतीमध्ये पोलीस दवाखाना कार्यान्वित केला असून सदर सुसज्ज अशा पोलीस दवाखान्याचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे यांच्या हस्ते दिनांक 13/12/2024 रोजी करण्यात आले आहे
तपशील पहा
जिम उद्घाटन समारंभ3 फोटो

जिम उद्घाटन समारंभ

२९ मार्च, २०२५

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दैनंदिन कर्तव्य व कामाचा ताण यामुळे त्यांचे प्रकृती स्वास्थ्याच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्या व स्वास्थ्य यांचे नियोजन होऊन त्यांना चांगले स्वास्थ्य लाभण्याकरिता विशेष काळजी घेण्याबाबत विविध उपक्रम राबविणे बाबत मा.श्री विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी संकल्पना मांडली होती त्यांचे संकल्पनेतून वाकड पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता सुसज्ज जिम तयार करण्यात आली त्याकरिता श्री विशाल गायकवाड सो पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 श्री सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त सो वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाप्रमाणे वाकड पोलीस ठाणे कडील श्री निवृत्ती कोल्हटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सुनियोजन करून सुसज्ज जिमची निर्मिती करण्यात आली आहे सदर जिमचे दिनांक 20/3/ 2025 रोजी मा. श्री विनय कुमार चौबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदर उद्घाटन समारंभाकरिता श्री विशाल गायकवाड सो पोलीस उपयुक्त परिमंडळ 2 श्री बापू बांगर सो पोलीस उप आयुक्त वाहतूक डॉ. शिवाजी पवार सो पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री विवेक पाटील सो पोलीस उपायुक्त मुख्यालय निवृत्ती कोल्हटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर नीता गायकवाड /खंदारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक( गुन्हे )वाकड पोलीस स्टेशन सुहास चव्हाण सपोनी अनिरुद्ध सावर्डे पोलीस उपनिरीक्षक इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सुजाण नागरिक व पत्रकार उपस्थितीत होते
तपशील पहा

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

Pimpri Chinchwad Police Emblem

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेम नगर, चिंचवड, पुणे - ४११०१९, महाराष्ट्र, भारत

cp.pcpc-mh@gov.in
  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • तातडीची मदत: १००
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय
  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती
  • संपर्क करा
  • ठिकाणे
  • ईमेल
साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरणशेवटचे अपडेट: १ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०४:२४ PM वाजता
अभ्यागत 527

© 2026 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
ज्येष्ठानुबंध ॲप
सुरक्षा मित्र
पोलीस आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp