
मा. विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे उत्तम आरोग्य व स्वास्थ्य मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 1/11/2025 रोजी सकाळी 11:30 ते 13:30 वा. पर्यंत श्री. बालाजी विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. श्री.विनय कुमार चौबे पोलीस आयुक्त यांनी उपस्थितांना आहार व स्वास्थ्य याबाबत मार्गदर्शन करून प्रस्तावित केले. तसेच मुख्य मार्गदर्शक डॉ. जगन्नाथ दीक्षित मधुमेह आहार तज्ञ यांचा सत्कार करून कार्यक्रमास सुरुवात केली. सदर कार्यक्रम प्रभावी करण्याकरता पोलीस अधिकारी अंमलदार यांना त्यांचे आरोग्य व स्वास्थ्य अनुषंगाने मार्गदर्शन होणेसाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये डॉ. जगन्नाथ दीक्षित मधुमेह व आहार तज्ञ यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालातील अधिकारी अंमलदार यांना निरोगी राहण्यासाठी आहार सवयी व्यायाम इत्यादी बाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केले पोलीस आयुक्तालयातील 600 अधिकारी व अंमलदार हजर होते पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.