
सायबर गुन्ह्यांसाठी दुबईतून भारतात १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. तपासादरम्यान सिमकार्ड पुरवठादारांसह एकूण ७ आरोपींना अटक करण्यात आली. या सिमकार्डचा वापर देशभरात सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे निष्पन्न झाले.