कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सदैव कटिबध्द राहतील.
विनय कुमार चौबे , भा.पो.से.,
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड.