तक्रार निवारण दिन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरीकांच्या तक्रारींचे तातडीने निराकारण होणेकामी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत विविध माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातात. यामध्ये वेब पोर्टल, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच प्रत्यक्षरीत्या पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस उप आयुक्त कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस ठाणे येथे दिलेले तक्रारी अर्ज महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल, केंद्र शासनाचे पी.जी.पोर्टल तसेच शासन व वरिष्ठ कार्यालयाकडुन वेगवेगळया प्रकारचे तक्रारी अर्ज प्राप्त होत असतात. या प्राप्त तक्रारी अर्जाचे संदर्भात मुदतीत उचित कार्यवाही करुन अर्जाची निर्गती करणे अपेक्षित आहे. नागरीकांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची वेळेत कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य नागरीकांची गैरसोय होत असते. त्याअनुषंगाने नागरीकांशी थेट संवाद साधता यावा व तक्रारदार यांची गैरसोय न होता त्यांच्या तक्रारीची वेळेत निरसन व्हावे याकरीता मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाणे येथे प्रत्येक महिन्याचे दर शनिवारी सकाळी १०/३० वा. ते दुपारी ०२/०० (१४/००) वा पर्यंत पोलीस उप-आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसचे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाच्या आयोजनाबाबत आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन येथे प्रत्येक महिन्याचे दर शनिवारी सकाळी १०/३० वा. ते १४/०० वा च्या दरम्यान तक्रार निवारण दिन मा. पोलीस उप आयुक्त, मा. सहायक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले होते. तक्रार निवारण दिनाचे दिवशी तक्रारदार यांनी आपआपल्या तक्रारी नुसार सबंधी पोलीस स्टेशन येथे उपस्थितीत रहावे असे आव्हान करण्यात आलेले आहे.