आमचे ध्येय

Our Mission

कायद्याची ठाम व नि:पक्षपातीपणे अंबलबजावणी करून, कायद्याचे राज्य अबाधित राखून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलयाच्या प्रगती व समृद्धी करीता पोषक असे भयमुक्त वातावरण निर्माण करण्यात आम्ही सदैव तत्पर राहु.

सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सचोटीने व पराकाष्ठाने प्रयत्न करून समाजातील प्रत्येक घटकाचे मदतीने सामाजिक आणि जातीय सलोखा वृद्धिगत करू. गुन्हेगार, गुंड व संघटित गुन्हेगारी, समाज विघातक प्रवृत्ती, तसेच अवैध धंदे करणारे यांच्या विरुद्ध तत्परतेने कारवाई करू अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारां विरुद्ध कठोर प्रतिबंध कारवाई करू. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित राखण्या करीता सातत्याने प्रयत्नशील राहु.

महिला, दुर्बल, दलित, अल्पसंख्य, गरीब व वंचित घटकांना सेवा सर्वतोपरी मदत करून त्यांचे संरक्षण करु. संकटात आलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे संवेदनशीलपणे तत्परतेने सहृदयतेने निवारण करु. सुरक्षित, निर्भय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय हा आम्ही घेतलेला संकल्प आहे. व्यापक लोकसहभागातून हा संकल्प सिद्धीस नेण्यास आम्ही यशस्वी होऊ.