महिला सहाय्यक कक्ष

Women Help Cell Police Station

About Us

महिला सहाय्यक पोलीस विभाग हा खास महिलांकरिता त्यांच्या तक्रारी व घरगुती हिंसाचार याबबाबतची प्रकरणे हाताळणीकरीता तयार करण्यात आला आहे. महिला सहाय्यक कक्षाचे मुख्य कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयात असुन आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर देखील महिला समित्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये महिला सामाजिक कार्यकर्त्या तसेच असाशकीय संस्थांच्या महिला देखील सदस्य आहेत. महिलांच्या विविध प्रकारच्या तक्ररींबाबत पिडीत महिला तसेच त्यांचे कुटुंबीय यांचे म्हणणे एकुण घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांचे मध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु समेट घडुन येत नसल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करीता संबंधीतांना पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात येते.