ट्रॅफिक बडी

शहरातील वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुरक्षित व अपघात मुक्त होऊन वाहतूक सुरळीत राहण्यासही मदत होईल. वाहतूक नियमन व वाहतूक नियमांचे पालन करून घेत असताना प्रत्येक बाब पोलिसांच्या व कॅमेऱ्याच्या नजरेस येणे अशक्य आहे. म्हणून आपण या चांगल्या कामात शहरातील नागरिकांना सहभागी करू इच्छितो. कल्पना अशी आहे की, नागरिकांच्या निदर्शनास येणारे वाहतुकीचे उल्लंघन पुराव्यासहित पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एक व्हाट्सअप चॅट बॉट विकसित करण्यात आले आहे. या ट्रॅफिक बडी व्हाट्सअप चॅट बॉट नंबर 8788649885 द्वारे, नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येते. यामुळे पोलीस व कॅमेऱ्यांच्या परोक्ष घडणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचतील. परिणामी वाहतूक नियमांचे जास्तीत जास्त पालन करून घेता येईल. नागरिकांची सुरक्षितता वाढेल व अपघात मुक्त प्रवास होईल.