मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaPimpri Chinchwad Police Emblemपिंपरी चिंचवड पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

Pimpri Chinchwad Police Emblem

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय

पोलीस आयुक्त कार्यालय, प्रेम नगर, चिंचवड, पुणे - ४११०१९, महाराष्ट्र, भारत

cp.pcpc-mh@gov.in
  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • तातडीची मदत: १००
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय
  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती
  • संपर्क करा
  • ठिकाणे
  • ईमेल
साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरणशेवटचे अपडेट: ६ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०५:१५ PM वाजता
अभ्यागत ...

© 2026 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
ज्येष्ठानुबंध ॲप
सुरक्षा मित्र
पोलीस आयुक्त भेटीची वेळ घ्या
Accessibility
Twitter
Instagram
Facebook
WhatsApp

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

ज्येष्ठानुबंध अॅप

ज्येष्ठानुबंध अॅप

पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्येष्ठानुबंध या अॅपमध्ये जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी कुशल व प्रशिक्षित अमंलदार यांचा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आलेला असुन सदरचे अॅप हे 24 तास सुरु राहणार आहे. सदर अॅपमध्ये आतापर्यंत पिंपरी चिंचवड शरिातील 20 हजार जेष्ठ नागरिकांनी नोंदणी केलेली आहे. हे केवळ अॅप नसुन तर ज्येष्ठ नागरिकांशी जोडलेले ऋणानुबंध आहेत. तसेच ज्येष्ठांना इतर कोणतीही मदत लागल्यास (उदा. एकाकी जेष्ठांना औषधे, जवळील हॉस्पिटलची नावे, अॅम्ब्युलन्स सेवा, तात्काळ संपर्क क्रमांकाची मदत तसेच इतर आवश्यक मदत लागल्यास सर्व माहिती इत्यादी) पोलीसांच्या मार्फत तात्काळ मदत उपलब्ध करुन दिली जाईल. या अॅपमध्ये आर्टीफिशियल इन्टिलिजन्सचा उपयोग करुन ज्येष्ठ नागरिकांना दिलेले सेवांचे विश्लेषण करुन सेवा अधिक गुणात्मक पध्दतीने देण्याचे काम याअॅप द्वारे देण्यात येईल. ज्येष्ठानुबंध हे एक अॅप नसून एका पिढीने दुस­या पिढीला दिलेला आदराचे, प्रेमाचे आणि सुरक्षिततेचे वचन आहे. मुल्य जपणा­या समाजाची आधुनिक ओळख म्हणजेच ज्येष्ठानुबंध अॅप आहे.

मोरया पुरस्कार

मोरया पुरस्कार

"मोरया पुरस्कार" हा पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आयोजित केला जातो, ज्याचा उद्देश गणपती मंडळांना जनसहभाग आणि जनजागृतीसाठी उत्तम प्रकारे कार्य करण्यास प्रोत्साहन देणे आहे. गणपती मंडळांना पर्यावरणपूरक आणि पारंपरिक सण साजरा करण्यासाठी प्रेरित केले जाते, जसे की लहान पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर, ध्वनी प्रदूषण टाळणे, सामाजिक विषयांवर देखावे सादर करणे, रस्त्यावर नाट्य प्रयोग करणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे इत्यादी. सर्वोत्कृष्ट गणपती मंडळाची निवड ‘केंद्रीय समिती’च्या ठरवलेल्या निकषांनुसार केली जाते. ही समिती नागरिक आणि पोलिस अधिकारी यांचा समावेश करून तयार केली जाते. "मोरया ट्रॉफी" विजेत्या मंडळाला जाहीर केली जाते. ही ट्रॉफी पोलीस आणि नागरिक यांच्यातील सहभाग वाढवण्यासाठी आणि सामाजिक उद्देशांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.

ट्रॅफिक बडी

ट्रॅफिक बडी

शहरातील वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता नागरिकांकडून वाहतूक नियमांचे पालन करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून नागरिकांचा प्रवास सुरक्षित व अपघात मुक्त होऊन वाहतूक सुरळीत राहण्यासही मदत होईल. वाहतूक नियमन व वाहतूक नियमांचे पालन करून घेत असताना प्रत्येक बाब पोलिसांच्या व कॅमेऱ्याच्या नजरेस येणे अशक्य आहे. म्हणून आपण या चांगल्या कामात शहरातील नागरिकांना सहभागी करू इच्छितो. कल्पना अशी आहे की, नागरिकांच्या निदर्शनास येणारे वाहतुकीचे उल्लंघन पुराव्यासहित पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून एक व्हाट्सअप चॅट बॉट विकसित करण्यात आले आहे. या ट्रॅफिक बडी व्हाट्सअप चॅट बॉट नंबर 8788649885 द्वारे, नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येते. यामुळे पोलीस व कॅमेऱ्यांच्या परोक्ष घडणाऱ्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या घटना पोलिसांपर्यंत पोहोचतील. परिणामी वाहतूक नियमांचे जास्तीत जास्त पालन करून घेता येईल. नागरिकांची सुरक्षितता वाढेल व अपघात मुक्त प्रवास होईल.

तक्रार निवारण दिन

तक्रार निवारण दिन

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरीकांच्या तक्रारींचे तातडीने निराकारण होणेकामी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत विविध माध्यमांद्वारे तक्रारी स्वीकारल्या जातात. यामध्ये वेब पोर्टल, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच प्रत्यक्षरीत्या पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस उप आयुक्त कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस ठाणे येथे दिलेले तक्रारी अर्ज महाराष्ट्र शासनाचे आपले सरकार पोर्टल, केंद्र शासनाचे पी.जी.पोर्टल तसेच शासन व वरिष्ठ कार्यालयाकडुन वेगवेगळया प्रकारचे तक्रारी अर्ज प्राप्त होत असतात. या प्राप्त तक्रारी अर्जाचे संदर्भात मुदतीत उचित कार्यवाही करुन अर्जाची निर्गती करणे अपेक्षित आहे. नागरीकांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची वेळेत कार्यवाही न झाल्याने सर्वसामान्य नागरीकांची गैरसोय होत असते. त्याअनुषंगाने नागरीकांशी थेट संवाद साधता यावा व तक्रारदार यांची गैरसोय न होता त्यांच्या तक्रारीची वेळेत निरसन व्हावे याकरीता मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस ठाणे येथे प्रत्येक महिन्याचे दर शनिवारी सकाळी १०/३० वा. ते दुपारी ०२/०० (१४/००) वा पर्यंत पोलीस उप-आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त तसचे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिनाच्या आयोजनाबाबत आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन येथे प्रत्येक महिन्याचे दर शनिवारी सकाळी १०/३० वा. ते १४/०० वा च्या दरम्यान तक्रार निवारण दिन मा. पोलीस उप आयुक्त, मा. सहायक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेले होते. तक्रार निवारण दिनाचे दिवशी तक्रारदार यांनी आपआपल्या तक्रारी नुसार सबंधी पोलीस स्टेशन येथे उपस्थितीत रहावे असे आव्हान करण्यात आलेले आहे.

ज्येष्ठ नागरिक कक्ष

ज्येष्ठ नागरिक कक्ष

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे ज्येष्ठ नागरिक कक्ष कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण 157 ज्येष्ठ नागरिक संघ असून त्यांची 8 विभागांमध्ये विभाग रचना असून, सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचा एक महासंघ आहे. सर्व विभागीय जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व पोलीस आयुक्तालयातील जेष्ठ नागरिक कक्ष एकमेकांशी whatsapp ग्रुप मध्ये संलग्न आहे. ज्येष्ठ नागरिक कक्ष व दामिनी पथक मधील महिला अंमलदार यांचे कडून वेळोवेळी एकटे दुकटे राहणारे जेष्ठ नागरिकांना भेटी दिला जातात व त्यांचा एकटेपणा घालविण्यासाठी त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. तसेच एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिकांना औषध वैद्यकीय उपचार घरातील गॅस सिलेंडर किंवा पेन्शन इत्यादी कामे करून देण्यासाठी मदत केली जाते. तसेच वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांना व विरंगुळाकेंद्रांना भेट देऊन किरकोळ अडचणी जागेवरच सोडविला जातात.

औद्योगिक तक्रार निवारण कक्ष

औद्योगिक तक्रार निवारण कक्ष

एमआयडीसी तील कारखाने टिकविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी एमआयडीसी भयमुक्त करण्यास प्राधान्य आहे. स्थानिक गुंड कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास देत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल कंपनी व्यवस्थापन उद्योजकांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे यांनी केले एमआयडीसी तील सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी स्वतंत्र महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यान्वित केले आहे तसेच डायल ११२ क्रमांकावरुन पोलीस मदत उपलब्ध होते औद्योगिक तक्रारींच्या निवारणासाठी पोलीसांच्या खंडणीविरोधी पथकामध्ये औद्योगिक तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.

एकूण 2 पैकी पान 1

मागील
पुढील