जिम उद्घाटन समारंभ

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दैनंदिन कर्तव्य व कामाचा ताण यामुळे त्यांचे प्रकृती स्वास्थ्याच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या समस्या व स्वास्थ्य यांचे नियोजन होऊन त्यांना चांगले स्वास्थ्य लाभण्याकरिता विशेष काळजी घेण्याबाबत विविध उपक्रम राबविणे बाबत मा.श्री विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी संकल्पना मांडली होती त्यांचे संकल्पनेतून वाकड पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता सुसज्ज जिम तयार करण्यात आली त्याकरिता श्री विशाल गायकवाड सो पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 श्री सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त सो वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाप्रमाणे वाकड पोलीस ठाणे कडील श्री निवृत्ती कोल्हटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सुनियोजन करून सुसज्ज जिमची निर्मिती करण्यात आली आहे सदर जिमचे दिनांक 20/3/ 2025 रोजी मा. श्री विनय कुमार चौबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदर उद्घाटन समारंभाकरिता श्री विशाल गायकवाड सो पोलीस उपयुक्त परिमंडळ 2 श्री बापू बांगर सो पोलीस उप आयुक्त वाहतूक डॉ. शिवाजी पवार सो पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री विवेक पाटील सो पोलीस उपायुक्त मुख्यालय निवृत्ती कोल्हटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर नीता गायकवाड /खंदारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक( गुन्हे )वाकड पोलीस स्टेशन सुहास चव्हाण सपोनी अनिरुद्ध सावर्डे पोलीस उपनिरीक्षक इतर पोलीस अधिकारी व अंमलदार सुजाण नागरिक व पत्रकार उपस्थितीत होते