पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस पाल्यांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय श्री विनय कुमार चौबे यांचे संकल्पनेतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मा. मुख्यमंत्री सो यांचा १०० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड आयुक्तलयामध्ये पोलीस पाल्यांकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल रहाटणी पुणे येथे आज रोजी आयोजित करण्यात आला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये कार्यरत आजी-माजी अधिकारी व अंमलदार यांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी व आपले दैनंदिन कामकाज करीत असताना एक कुटुंब प्रमुख म्हणून पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी त्यांचे प्रति असलेली आपली बांधिलकी ही जोपासली. सदर कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे मा. श्री. वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. शिवाजी पवार पोलीस उपयुक्त परिमंडळ 3 श्री. विशाल गायकवाड पोलीस उपयुक्त परिमंडळ 2, श्री. सुनील कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, सदर रोजगार मेळाव्यास टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज, हुंडाई, लुमॅक्स या नावाजलेल्या कंपन्यांसह ऐकून 37 विविध कंपन्यांचे प्रतिनिधी एच आर व 250 पोलीस पाल्ये उपस्थित होते उपस्थित उमेदवार पैकी पाल्यांची निवड करण्यात आली तसेच मुलाखतीच्या दुसऱ्या तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी उमेदवारांची निवड होऊ शकते श्री विशाल गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर श्री डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उप आयुक्त परिमंडळ 3 यांनी आभार प्रदर्शन केले