About Us
ज्येष्ठ नागरिक कक्ष
दिनांक १०/०२/२०२० रोजी करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे स्थापनेमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यास मदत झालेली आहे. मुले, सुना ,नातवंड किंवा इतर नातेवाईक यांचेकडून जेष्ठ नागरिक यांच्या कडे होणारे दुर्लक्ष हेळसांड, घर, प्रॉपर्टी फसवून नावावर करून घेणे, त्यांना घरातून हाकलून देणे जेवण व औषधोपचार अशा अत्यावश्यक जीवनोपयोगी गरजांपासून त्यांना वंचित ठेवणे याबाबत ज्येष्ठ नागरिक यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित व्यक्तींना या कक्षात बोलावून त्यांचेतील समज -गैरसमज समुपदेशनाद्वारे दूर करण्यात येतात . जे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरीता इकडील कार्यालयात येतात सर्वप्रथम त्यांची आदराने विचारपूस केली जाते. जेणेकरून त्यांना त्यांच्या तक्रारींचे /अडचणीचे निवारण होऊन आवश्यक ती सर्व मदत केली जाईल याबाबत विश्वास निर्माण होतो. त्यांनी त्यांचे तक्रारीबाबत आणलेल्या अर्जातील तक्रार कौटुंबिक कारणांवरून मुले, सुना व नातवंडे यांचे संबंधित असतील तर सदरच्या अर्जाची इकडील कक्षाकडून स्वतः चौकशी करण्यात येत असते. त्याकरिता अर्जदार व गैरअर्जदार यांना एकत्रितरित्या बोलावून त्यांचेत चर्चा घडवून आपसातील समज -गैरसमज दूर करून ज्येष्ठ नागरिकाचे पूर्ण समाधान झाल्याची खात्री झाल्यावरच त्यांची तक्रार दफ्तरी दाखल करण्यात येते. समाजातील इतर घटकांकडून ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा फायदा घेऊन आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार आल्यास त्यांच्या तक्रारीबाबत प्राथमिक तत्वावर विचारपूस करून च्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे. त्या पोलिस स्टेशनला संबंधित तक्रार पुढील योग्य त्या कार्यवाहीकरीता पाठवण्यात येते. सदर तक्रारी बाबत योग्य ती कार्यवाही करून झाल्यानंतर तक्रार दप्तरी फाईल करण्याकरता आल्यानंतर इकडील रजिस्टरला सदर तक्रारींची नोंद कमी करण्यात येते. ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये जेष्ठ नागरिकांचे सुरक्षा व सोयीसाठी १०९० हा हेल्पलाईन नंबर २४ तास सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच पोलीस स्टेशन व जेष्ठ नागरिक कक्ष यांचेत माहितीची देवाणघेवाण होणेकरीता ज्येष्ठ नागरिक कक्ष २०२२ व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे.