About Us
इंटरनेटच्या माध्यमातुन होणारे गुन्हे (उदा. संकेतस्थळ हॅक करणे, अशिल्लतेचा प्रसार करणे, ई-मेल द्वारे फसवणुक, क्रेडिट कार्ड बाबतचे गुन्हे, सॉफ्टवेअर प्रणालीबाबतचे गुन्हे, ऑनलाईन आर्थिक व्यवहारामधील फसवणुक इ.) याबाबत तपास करणेचे मुख्य काम सायबर सेल च्या माध्यमातुन करण्यात येते. पोलीस आयुक्तालयामध्ये सायबर सेल ची स्थापना होऊन दि. २७/१०/५०१८ पासुन सायबर सेल कार्यान्वित झाला आहे. सायबर सेल चे कामकाज मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा ) यांचे पर्यवेक्षण व देखरेखी खाली होते.
सायबर सेल मार्फत प्रामुख्याने खालील कामे केली जातात.
१) सायबर क्राईम सेल चे उद्दिष्ट विविध प्रकारचे सायबर क्राईम रोखणे आणि शोधणे आहे.
२) पिंपरी चिंचवड पोलीस कर्मचाऱ्यांना सायबर गुन्हे अन्वेषणात नियमित प्रशिक्षण देणे
३) शाळा ,महाविद्यालय आणि संस्थांमध्ये सायबर क्राईम प्रतिबंध जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे .
४) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील स्थानिक पोलीस स्टेशनचे ,गुन्हे शाखा युनिटचे ,अन्वेषण अधिकारी व इतर शाखा यांना सायबर गुन्हे तपासाविषयी मदत व मार्गदर्शन करणे.
५) सोशल मीडियावर नजर ठेऊन आहे.